Thursday, May 14, 2020

माझी पहिली कमाई


किती अभिमान वाटतो न, कुणी आपल्याला विचारल की तुमची पहिली कमाई किती होती? तो सगळा काळच समोर उभा राहातो. पहिले तर शिक्षण, त्यासाठी केलेली वणवण मग नोकरी साठी केलेली वणवण शोधा शोध धक्का बुक्की. ते पचवलेले नकार आणि त्यातुन शिकलेला ताठ मानेने उभा राहिलेला एक जीव सगळ कस स्वप्नवतच. आपण जेव्हा नुकतेच जन्माला आलेलो असतो तेव्हा आपल्या कडे काहीच नसत फक्त एका नावा शिवाय ते ही आपल्या आई वडीलांनी दिलेल्या. आणि त्याच नावाला पुढे आपल्याला मोठ करायच असत आणि तोच असतो आपला संघर्ष. आधी शाळा शिका, मग कॉलेजची डीग्री घ्या प्रत्येक परिक्षेत पास होण्याचा ध्यास, टेन्शन अभ्यासाच टेन्शन पुढे जगा बरोबर चालायच टेन्शन हया सगळयाला पार केल्या नंतर येतो नोकरीचा क्षण त्यातही गलेलठ्ठ पगाराची नोकरी मीळाली तर ठीक नाही तर परत नोकरी साठी वणवण का तर “मी सॅटिसफाईड नाही” म्हणून दुसरी नोकरी. आणि मिळालीच एखादी ठीक ठीक नोकरी तर त्यातही “नाही, ठीक आहे मी खुश हयात. काय करणार आता जे मिळालय त्याला स्वीकारायच. शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न आहे न. आपल्या सारख्या लोकांना कोण चांगली नोकरी देणार.” अस म्हणत समोर आलेल्या प्रत्येक परिस्थीतीला स्वीकारायच. यालाच जीवन अस म्हणतात. आणि याच जीवनातुन आपण ही शिकत असतो उभ रहात पडत. पण या सगळया साठी जे कराव लागत ते म्हणजे आधी घरातुन बाहेर पडण. आपण जो पर्यंत बाहेर पडत नाही तो पर्यंत आपल्याला जग समजत नाही. खरय नं.. मला आठवतय २०१० मी एका कंम्प्युटरच्या क्लास मध्ये शिकवायला जायचे. जवळ जवळ १ वर्ष मि मुलांना शिकवल पण त्या वेळेस माझी परिस्थी अशी होती की, मी त्यांना हे ही सांगू शकले नाही की मला माझी सॅलरी दया. हो पण मुलांना शिकवता शिकवता त्यांच्याशी बोलता बोलता मला माझ्यातली मी कधी सापडले मलाच कळाल नाही. जिच्या मध्ये आत्मविश्वासाची कमी होती तीच मुलगी बाहेर पडुन वेग-वेगळया छोटया छोटया सामाजीक कार्यात सहभागी होउ लागली. तीनेच स्वत: हिमत्त करुन वेग-वेगळया संधींची दारे उघडली. आणि हीच मला माझी पहिली कमाई वाटते. तुम्ही पैसे खुप कमवाल पण तुम्ही जर लोकांसमोरच जाउ शकला नाहीत तर तुम्ही काय नोकरी करणार. तुमचा अत्मविश्वासच हा तुमच्या आयुष्याचा आधार असतो जर तो तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पुढे जाण्या वाचुन कोणी थांबउ शकत नाही.  

2 comments: