Friday, May 29, 2020

शोध - एक रहस्य(भाग-५)

डॉ. रामनच्या केबीन मध्ये.. डॉक्टरांची आवरा आवर सुरू आहे तेवढयात डॉ. रुद्रा केबीन मध्ये येतात. “मे आय कमीन डॉक्टर?” आवरता आवरता डॉक्टर रामन. “ओह, यस.. यस.. कमीन.” डॉक्टर रुद्रा केबीन मध्ये येतात. डॉक्टर रामन. “सीट. मग.(थोडस थांबत) काही तपास लागला वशिष्ठचा त्या मुलाची आपल्यावर खुप मोठी जबाबदारी आहे माहीम आहे न.” डॉक्टर रुद्रा. “हो डॉक्टर माहीत आहे मी पण आज त्या साठीच आलोय काही सांगायच होत तुम्हाला” डॉक्टर रामन. “हं, एनी प्रोग्रेस?” डॉक्टर रुद्रा. “हो डॉक्टर, तस म्हणल तर आहे. पण ही गोष्ट किती महत्वाची आहे ते नीट सांगता येणार नाही.” डॉक्टर रामन. “मला एक्स्युजेस नकोय डॉक्टर मला एनी हाउ रिझल्ट हवाय. किती वेळेस सांगाव लागेल तुम्हाला वशिष्ठ आपल्या कामा साठी खुप महत्वाचा मुलगा आहे पण त्याचा जीव धोक्यात टाकुन नव्हे. उदया त्याच्या जीवाच काही बर वाईट झाल तर काय उत्तर देणार आहोत आपण त्याच्या आई वडीलांना असो तुला काही बोलायच होत न.” डॉक्टर रुद्रा. “हो डॉक्टर. मला वशिष्ठ बद्दल सांगायच होत जरा.” डॉक्टर रामन. “हं, बोल काय सांगायच होत तुला.” डॉक्टर रुद्रा. “डॉक्टर मी काल रात्रभर हाच विचार करत होतो की, गडबड कुठे झाली ते. मी वशिष्ठची जबाबदारी वॉर्डबॉय अशोकला दिली होती. आणि रात्री हॉस्पिटलचे लाईट ही गेले होते तसेच पाउस आणि वादळ ही सुटल होत त्या अंधारात वशिष्ठ कधी आणि कस निघून गेला हे कुणालाच समजल नाही. शिवाय लाईट गेले असल्याने हॉस्पिटलचे सी.सी. टिव्ही कॅमेरे सुध्दा काम करत नव्हते म्हणून कुणालाच समजल नाही हे सगळ कस घडल ते.(थोड थांबत) एक आणखी एक गोष्ट आहे सर.” डॉक्टर रामन. “कसली गोष्ट.” डॉक्टर रुद्रा. “डॉक्टर मी कॅमेरा चेक करत होतो तेव्हा मला हे दिसल हे बघा.(रामन बघतात) मला वाटत सर हे काही तरी वेगळच प्रकरण आहे. आपल्याला जरा सावध रहायला हव.” डॉक्टर रामन. “(विचार करत)हं, खरय हे काही तरी वेगळ आहे. लवकरात लवकर याला शोधायला हव. बरं त्या दुस-या मुलाच काय झाल?” डॉक्टर रुद्रा. “डॉक्टर तो आज येणार आहे. माझ बोलण झालय त्याच्याशी.” डॉक्टर रुद्रा आणि रामण दोघ आपापसात बोलत असतात तेवढयात रिसेप्शनिष्ट वैदेही केबीन मध्ये येते. “मे आय कमीन डॉक्टर.” डॉक्टर रामन. “यस कमीन. बोल काय काम होत.” वैदेही. “डॉक्टर बाहेर पोलीस आले आहेत भेटायच म्हणत आहेत.” दोघ एक मेकांकडे आश्च-याने बघत. “पोलीस.. इथे? (थोडी शांतता)

Monday, May 18, 2020

खता तो जब हो के(द‍िल का क्या कसूर)


वाचक हो धन्यवाद,
आत्ता पर्यंत तुम्ही मला खुप चांगला प्रतिसाद देत आला आहात. माझ्या काही पोस्ट मध्ये चुक असेल तर ती ही सांगत आलात त्य बद्दल परत धन्यवाद. आता मी घेउन आलीए एक नवीन पोस्ट. “मला आवडलेली गाणी.” या मध्ये जी मला गाणी आवडतात जी गाणी मी गुणगुणते त्या प्रत्येक गाण्यांची माहिती आणी रसग्रहण असेल.
दिल का क्या कसूर १९९२ ची लॉरेन डिसूजा निर्देशित चित्रपट.
गीताचे बोल: खता तो जब हो के
खता तो जब हो के
हम हाल-ए-दिल किसी से कहे
खता तो जब हो के
हम हाल-ए-दिल किसी से कहे
खता तो जब हो के
हम हाल-ए-दिल किसी से कहे
किसी को चाहते रहना कोई खता तो नही
किसी को चाहते रहना कोई खता तो नही
खता तो जब हो के
हम हाल-ए-दिल किसी से कहे.
किसी को चाहते रहना कोई खता तो नही
किसी को चाहते रहना कोई खता तो नही
अमीर तु है...
अमीर तु है तो
इतना जरा बतादे मुझे.
गरीब मै हु
पर ये मेरी खता तो नही
गरीब मै हु
पर ये मेरी खता तो नही
किसी को चाहते रहना कोई खता तो नही.
तुझे भी प्यार है
तुझे भी प्यार है
मुझसे मै जानती हु सनम
ये बात और है
मुझसे कभी कहा तो नही
ये बात और है
मुझसे कभी कहा तो नही.
किसी को चाहते रहना कोई खता तो नही
हर एक पल मै
हर एक पल मै
तुझे याद किया करता हु
तुझे भुला के मै
पल भर कभी जीया तो नही
तुझे भुला के मै
पल भर कभी जीया तो नही
किसी को चाहते रहना कोई खता तो नही
खता तो जब हो के
हम हाल-ए-दिल किसी से कहे
किसी को चाहते रहना कोई खता तो नही
किसी को चाहते रहना कोई खता तो नही
किसी को चाहते रहना कोई खता तो नही
किसी को चाहते रहना कोई खता तो नही
१९९२ मधील दिल का क्या कसूर मधील हे सुंदर गीत अनवर सागर यांनी लिहीलय तर कुमार सानु आणि अल्का याग्निक यांनी गायल आहे. अनवर सागर यांच्या या गिताचा अर्थ खुपच सुंदर आहे यात त्यांनी सांगितलय एखादयावर प्रेम करण ही चुक नाहीये प्रेम हा शब्दच खुप वेगळा आहे अगदी मनाला भीडणारा प्रेम जात पात अमीरी गरीबी बघत नाही आणि हेच वर्णन त्यांनी या गीतात केले आहे. अलका याग्निकचा आणि कुमार सानु यांचा आवाज खुपच सुंदर वाटला आहे म्हणूनच हे गीत अगदी लक्षात राहात. तसेच आपल जे दोन कलाकार लक्ष वेधून घेतात ते म्हणजे दिव्या भारती आणि अरुण कुमार यांच ही काम खुपच छान झालेल आहे. म्हणून हा चित्रपट लक्षात राहतो आणि गाणी ही.  

Sunday, May 17, 2020

शोध - एक रहस्य(भाग-४)


रात्रीची वेळ...

वॉर्ड मध्ये अचानक.. लाईट जातात..

चंद्रप्रकाशात...

वशिष्ठ आपल्या बेडवर कुणाशी तरी बोलत बसलाय...

वशिष्ठ(बेडवर एकटाच आहे आणि मनाशीच बोलतोय.) “अरे. तुला सांगितल होत न मी इथे येउ नकोस म्हणून जेव्हा वेळ येईल मी स्वत: तुला भेटायला येईल. मग तु इथे का आलास?  कुणी तुला पाहिल म्हणजे”

अदृष्य व्यक्ती. “अरे विसरलास का तु? लहानपणा पासुन फक्त तुच मला बघु शकतोस अजुन कुणी नाही. आपला जन्म हा साधा सुधा जन्म नाहीये आपण एक खुप मोठ कार्य करायला जन्माला आलो आहे. आणि आता ती वेळ आलेली आहे. हेच मी इथे सांगायला आलोय. तु तयार आहेस न.”

वशिष्ठ(थोडस चिडत) “हे बघ मी काय करायच आणि काय नाही हे तु मला नको सांगुस मी काय करायच आहे ते मी बघीन. जस सेवाभावी संस्थेतुन बाहेर यायला मला वेळ लागला नाही तस इथुन बाहेर पडायला ही वेळ लागणार नाही तु फक्त माझी वाट पहा आपल्या नेहमीच्या ठीकणी मी आलो की मग पुढच प्लॅनिंग करुत. आता तु निघ.”

अदृष्य व्यक्ती. “ठीकए... ठीकए... मी फक्त बॉसचा निरोप सांगायला आलो होतो. येतो मी.” अदृष्य व्यक्ती निघुन जातो.

सी. सी. टिव्ही कॅमेराच्या कंट्रोलरुम मधून अशोक(वॉर्ड बॉय) हे सगळ बघत असतो. तो डॉ. रुद्राला बोलावतो आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग दाखवतो.

डॉ. रुद्रा. “ग्रेट.. गुड जॉब मला हेच हव होत पण एवढयावरच भागुन चालणार नाही. तु अजुन हयाच्या वर पाळत ठेव मला हयाच्या प्रत्येक मुवमेंटचा अपडेट हवाय. सकाळी हयाचा रिपोर्ट बनउन डॉक्टरांना देउत.”

अशोक. “ठीक आहे डॉक्टर मी तुम्हाला सगळे अपडेप देतो.” डॉ. रुद्रा कंट्रोलरुम मधुन निघून जातात. आणि अशोक परत वशिष्ठवर लक्ष ठेवण्यात मग्न होतो.

काही वेळा नंतर...

अशोक चहा घ्यायला बाहेर जातो तेवढयात संधी साधुन वशिष्ठ हॉस्पिटल मधुन बाहेर पडतो.

वर्तमान काळात..

डॉ. रुद्रा. “दॅट्स इट, आता सगळया कडया जुळताएत. सगळ कस स्पष्ट झालय. अशोकवर एक काम सोपवल तर ते ही धड करता आल नाही त्याला हॉस्पिटल मध्ये गेल्यावर आधी त्याला बघतो. पण वशिष्ठच्या अश्या वागण्याने हा काही तरी वेगळाच प्रकार आहे एवढ तरी नक्कीच जाणवत. आता इथुन पुढे खुप सावध रहायला हवं असो वशिष्ठ हरवला कसा एवढ तर समजल. पण ही माहीती ही अर्धवटच आहे जर वशिष्ठ निघुन गेला आहे तर नेमका कुठे गेला असणार. त्याच्या बोलण्या वरुन तो कुणाला तरी भेटायच ठरवत होता पण कुणाला? छे सगळीच उत्तर अनुत्तरीत आहेत उदया डॉक्टरांना भेटूनच ठरवाव लागेल. डॉक्टर रुद्रा विचरातुन बाहेर येत अपल्या बेड कडे जातात.

क्रमश:

Thursday, May 14, 2020

माझी पहिली कमाई


किती अभिमान वाटतो न, कुणी आपल्याला विचारल की तुमची पहिली कमाई किती होती? तो सगळा काळच समोर उभा राहातो. पहिले तर शिक्षण, त्यासाठी केलेली वणवण मग नोकरी साठी केलेली वणवण शोधा शोध धक्का बुक्की. ते पचवलेले नकार आणि त्यातुन शिकलेला ताठ मानेने उभा राहिलेला एक जीव सगळ कस स्वप्नवतच. आपण जेव्हा नुकतेच जन्माला आलेलो असतो तेव्हा आपल्या कडे काहीच नसत फक्त एका नावा शिवाय ते ही आपल्या आई वडीलांनी दिलेल्या. आणि त्याच नावाला पुढे आपल्याला मोठ करायच असत आणि तोच असतो आपला संघर्ष. आधी शाळा शिका, मग कॉलेजची डीग्री घ्या प्रत्येक परिक्षेत पास होण्याचा ध्यास, टेन्शन अभ्यासाच टेन्शन पुढे जगा बरोबर चालायच टेन्शन हया सगळयाला पार केल्या नंतर येतो नोकरीचा क्षण त्यातही गलेलठ्ठ पगाराची नोकरी मीळाली तर ठीक नाही तर परत नोकरी साठी वणवण का तर “मी सॅटिसफाईड नाही” म्हणून दुसरी नोकरी. आणि मिळालीच एखादी ठीक ठीक नोकरी तर त्यातही “नाही, ठीक आहे मी खुश हयात. काय करणार आता जे मिळालय त्याला स्वीकारायच. शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न आहे न. आपल्या सारख्या लोकांना कोण चांगली नोकरी देणार.” अस म्हणत समोर आलेल्या प्रत्येक परिस्थीतीला स्वीकारायच. यालाच जीवन अस म्हणतात. आणि याच जीवनातुन आपण ही शिकत असतो उभ रहात पडत. पण या सगळया साठी जे कराव लागत ते म्हणजे आधी घरातुन बाहेर पडण. आपण जो पर्यंत बाहेर पडत नाही तो पर्यंत आपल्याला जग समजत नाही. खरय नं.. मला आठवतय २०१० मी एका कंम्प्युटरच्या क्लास मध्ये शिकवायला जायचे. जवळ जवळ १ वर्ष मि मुलांना शिकवल पण त्या वेळेस माझी परिस्थी अशी होती की, मी त्यांना हे ही सांगू शकले नाही की मला माझी सॅलरी दया. हो पण मुलांना शिकवता शिकवता त्यांच्याशी बोलता बोलता मला माझ्यातली मी कधी सापडले मलाच कळाल नाही. जिच्या मध्ये आत्मविश्वासाची कमी होती तीच मुलगी बाहेर पडुन वेग-वेगळया छोटया छोटया सामाजीक कार्यात सहभागी होउ लागली. तीनेच स्वत: हिमत्त करुन वेग-वेगळया संधींची दारे उघडली. आणि हीच मला माझी पहिली कमाई वाटते. तुम्ही पैसे खुप कमवाल पण तुम्ही जर लोकांसमोरच जाउ शकला नाहीत तर तुम्ही काय नोकरी करणार. तुमचा अत्मविश्वासच हा तुमच्या आयुष्याचा आधार असतो जर तो तुमच्याकडे असेल तर तुम्हाला पुढे जाण्या वाचुन कोणी थांबउ शकत नाही.