Tuesday, April 21, 2020

निराशेतुन बाहेर पडायच आहे? मग हे कराच



आपण कधी कधी खुप निराश होतो. अस वाटत आता आपल्या समोरचे सगळे मार्ग संपले आहेत आपण खुप हताश झालो आहोत अशा वेळेस कधीही धीर सोडु नका. एक लक्षात ठेवा जेव्हा कधी अस वाटु लागत तेव्हा ती एक नवीन सुरवात असते आपल्याला मार्ग मिळणार असतात. तेव्हा स्वत:वर पुर्ण विश्वास ठेउन निराशेतुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. सगळयात आधी निराश होण्याच हताश होण्याच कारण शोधा. आपल्याला निराशेतुन बाहेर पडायला प्रवृत्त करतील अशी पुस्तक वाचा बायोग्राफिज वाचा नेहमी सकारातत्मक विचार करा. मनाशी एक पक्क करा की आपण यातुन नक्की बाहेर पडणार आहोत. आणि आपल्याला मार्ग नक्की मिळणार आहे हा विश्वास मनाशी पक्का बाळगा. आपल्याला स्फूर्ती देईल अशी गाणी ऐका जर मनात नकारात्मक विचार येत असतील तर त्या विचारांना तीथेच थांबवा आणि म्हणा “मी निराश नाही” मला सगळ मिळाल आहे जे मला हव होत. मित्र- मैत्रीणींना भेटून या त्याना आपल्या मनातला सांगा कधी कधी आपलेच मित्र-मैत्रीणी आपल्याला योग्य मार्ग दाखवु शकतात. रोज ध्यान करा ध्यानाने मन शांत होत आणि आपण खुप चांगल्या प्रकारे विचार करु शकतो. व्यायामाने सुध्दा मन प्रसन्न राहात तेव्हा रोज व्यायाम करत जा व्यायाम हे शरीरासाठी आणि मनासाठी देखील खुप महत्वाचे असतात म्हणून नेहमी व्यायाम केलाच पाहिजे. आपल्या घरच्यांना वेळ दया आपल्याला समजुन घेणारे आपले घरचेच असतात आपल्याला कुठला त्रास आहे हे आपल्या आधी आपल्या घरच्यांनाच समजत असत म्हणून थोडा तरी त्यांच्या साठी वेळ काढाच. तुम्ही आपले छंद देखील जोपासु शकता आपल्या छंदामुळे आपल्याला नवीन तर शिकायला मिळतच शिवाय आपल मनही रमत म्हणून आपले छंद जोपासा. जगात बरच काही शिकण्यासारख आहे ज्याने आपण आपल्या निराशेच्या गर्तेतुन सहज बाहेर येउ शकतो गरज आहे ती फक्त शोधण्याची. बघा शोधून...

Sunday, April 19, 2020

ब्लॅक ब्रिफकेस(चित्रपट रसग्रहण)



हा चित्रपट फक्त १६:१९ मिनीटाचा एक लघूचित्रपट आहे. हा चित्रपट बघण्याच विशेष कारण म्हणजे हयात एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ईसमाच्या मनोदशेच वर्णन केल गेलय. आणि विशेष म्हणजे हयामध्ये कुणीही नायिका आणि संवाद नाहीये हया चित्रपटाची संपुर्ण कथा ही फक्त नायक आणि नायकाच्या मनोदशे भोवती फिरते. चित्रपटाची सुरूवात ही नायकाला एक फोन येतो आणि नायक झोपेतुन उठुन आपल आवरु लागतो. तसेच बाँम्ब ब्लास्टची तयारी करु लागतो. पण त्याच मन या कृत्याला ग्वाही देत नाही. आणि मग सुरू होतो त्याचा आणि त्याच्या मनाचा संघर्ष या चित्रपटात मनाच्या दोन बाजु दाखवण्यात आल्या आहेत त्याला त्याच एक मन बाँम्बस्फोट कर सांगत असत आणि एक मन सांगत असत नको करुस यात तो पुर्ण अडकलेला असतो. आणि शेवटी त्याच्या चांगल्या मनाचा विजय होतो. ही कथा आहे. “ब्लॅक ब्रिफकेस” लघुचित्रपटाची चित्रपटाच दिग्दर्शन केलय कार्तिक सिंग यांनी तर सहायक दिग्दर्शन शंतनु सिंग यांनी केलय. तर या चित्रपटाचे निर्माते आहेत विवेक पॉल आणि कलाकार आहे मनीश पॉल. कुटलीही व्यक्ती ही जन्मताच गुन्हेगार नसते परिस्थीती त्याला गुन्हेगार बनवते. टिसीरीजच्या या लघुचित्रपटाचा हाच संदेश आहे म्हणून हा चित्रपट एकदा तरी बघावाच असाच आहे.   

Friday, April 17, 2020

स्वविकासास मदत होईल अशी ४ पुस्तके



अस म्हणल जात. “वाचाल तरच वाचाल” म्हणजे तुम्ही सतत काही न काही वाचत राहीलात ज्ञान संपादन करत राहीलात तरच वाचाल. तुम्हाला नवीन काही तरी शिकायला मिळेल पण मग नेमक काय वाचायच. ज्याने काही तरी शिकायला मिळेल आपला स्वविकास होईल. तर आज अश्या काही पुस्तकांची माहीती घेउत जी तुमचा स्वविकास करायला तुम्हाला मदत करेल. ही आहेत ती पुस्तके:
सध्या कोरोनाची प्रचंड साथ सुरू आहे अशात जर कुठली गरज असेल तर ती म्हणजे मन:शांतीची आज आपल्याकडे भरपुर वेळ आहे स्वत:मधे बदल करण्यासाठी आणी त्या साठी अगदी योग्य पुस्तक म्हणजे
द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माईंड - आपल्या अचेतन मनाची शक्ती. या पुस्तकाचा उपयोग करुन तुम्ही आपले आरोग्य सुधारु शकता, आपले आजार बरे करु शकता, आपले निश्चीत धेय गाठु शकता, आपल्या मित्रांचे वर्तुळ विस्तारु शकता तसेच कुटुंब, सहकारी, आणि मित्रांशी चांगले संबंध निर्माण करु शकता, तुमचे वैवाहिक जीवन तसेच प्रेम संबंध अधिक दृढ करु शकता, आपल्या भीती आणि वाईट व्यसनांपासून मुक्तता मिळवू शकता. हे पुस्तक तुम्हाला खुप समृध्द करेल एक नवी उर्जा देईल आणि आजच्या घडीला अश्या पुस्तकाची आपणा सर्वाना नितांत गरज आहे. हया पुस्तकात आपल्या अचेतन मनाच्या शक्तीच महत्व सांगितल गेलय आणि त्या शक्तीच्या जोरावर आपण एखादी असाध्य गोष्ट कशी साध्य करु शकतो ते खुपच साध्या आणि सोप्या शब्दात सांगितल गेलय त्यामुळे पुस्तकाची भाषा कुणालाही पटकन लक्षात येईल अशीच आहे. आणि म्हणून हे पुस्तक सगळयांनी वाचण्या सारख आहे.
आपले जगणे हे आपल्याच हातात असते आपणच जबाबदार असतो आपल्या आयुष्यात घडणार्या प्रत्येक घटनेला आणि आजाराना देखील. हे सांगणार लुईस. एल. हे यांच पुस्तक म्हणजे “यू कॅन हील युवर लाईफ” कुणी जर निराशावादी असेल, एक सारख अपयशी होत असेल तर त्यांनी हे पुस्तक जरुर वाचाव तसेच जर आपल दैनंदीन आयुष्य बदलण्याची ईच्छा असेल आयुष्यात काही तरी मिळवायच असेल तर त्यांनी सुध्दा हे पुस्तक जरुर वाचाव. या पुस्तकात तुम्हाला लुईस. एल. हे. यांची कहानी वाचायला मिळेल त्यांना कॅन्सर सारखा दुर्धर रोग झाला होता तेव्हा त्यांनी त्या रोगावर कशी मात केली हेही जाणून घेता येईल तसेच त्यांनी या पुस्तकात जी सकारात्मक वाक्ये दिली आहेत त्यांचा उपयोग करुन यश कस मिळवायच हे ही तुम्हाला हे पुस्तक वाचुन समजेल सगळयां साठी प्रेरणा देणार हे पुस्तक प्रत्येकानी एकदा तरी वाचलच पाहीजे असच आहे.
मिनी हॅबिटस – लहान सवयींचे महान परिणाम. ज्यांना आपल्या नेहमीच्या सवयींमध्ये बदल करण्याची ईच्छा आहे त्यांच्या साठी हे पुस्तक एक सर्वोत्तम पर्याय आहे. प्रत्येकालाच जीवनात काही बदल घडवून आणायचे असतात. लोक तसा प्रयत्नही करतात. काही प्रमाणात बदल घडवतातही. पण ते बदल तात्पुरतेच असतात. पण मिनी हॅबिटसच्या या पध्दतीमध्ये कुठल्याही प्रकारे स्वत:च्या मनाविरुध्द न जाता आपण जगातल्या या महान गोष्टी साध्य करु शकतो विशेष म्हणजे त्यासाठी स्वत:वर जबरदस्ती करण्याची आजिबात गरज नाही. मिनी हॅबिटस ही एक अशी छोटीशी कृती आहे जी रोज करण्यासाठी तुम्ही स्वत:ला सहज प्रवृत्त करु शकता. छोटी सवय ही बाबच अतिशय छोटीशी असल्यामुळे त्यात अपयश येण्याची शक्यता खूप कमी असते. त्यामुळे आचरणात आणण्यासाठी साहजीकच हलकी-फुलकी पण शक्तिशाली असते. म्हणूनच चांगल्या मिनी हॅबिटस निर्माण करणे हा एक सोपा आणि उत्तम मार्ग आहे, जो तुम्हाला या पुस्तकातून मिळेल. या पुस्तकाचे मूळ लेखक स्टीफन गुज हे असुन विदया अंबिके यांनी या पुस्तकाला अनुवादित केलेल आहे. या पुस्तकात तुम्हाला मिनी हॅबिटसचे तंत्र शिकायला मिळेल तसेच लेखकाने आपल्या एक पुश-अप या इतक्या छोटया सवयीने आपल्या व्यायामाचे आव्हान कसे पेलले या कहानी वरुन तुम्हाला छोटया सवयींच महत्व ही समजुन येईल. या पुस्तकात रोज नवीन शिकण्यासारख आहे नक्की हे पुस्तक वाचुन बघा.
टाईम मॅनेजमेंट वेळ कुणाकडे नसते वेळ ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाकडेच असते. पण आपल्याला जमत नाही ते म्हणजे वेळेच व्यवस्थापन करायला म्हणजेच टाईम मॅनेजमेंट करायला. आज जाणून घेउत हया वेळेच व्यवस्थापन करायच कस आणि ते तुम्हाला जाणून घ्यायला मिळेल डॉ, रेखा व्यास यांच्या पुस्तकातून. या पुस्तकात तुम्हाला वेळेचे व्यवस्थापन कस करायच, प्राधान्य क्रम कसा ठरवायचा, आपले वेळापत्रक कसे बनवायचे कामाचे मुल्यांकन कसे करायचे अश्या सगळयाच गोष्टी शिकायला मिळतील. आज अशी परिस्थीती आहे की आपला वेळ हा जाताच जात नाही अश्या वेळेस आपली रखडलेली काम ही तशीच राहुन जातात म्हणून आपल्याला हे माहीत करुन घेण खूपच आवश्यक आहे की नेमक हया वेळेचा उपयोग कसा करायचा आणि तेच हे पुस्तक आपल्याला शिकवत.            

Thursday, April 16, 2020

स्पिरीट बीअर...





ही कथा आहे एका १४ वर्षीय सिमॉन जॅक्सनची. कोण आहे हा सिमॉन जॅक्सन? आणि त्यानी अस वेगळ काय केल. जाणून घेउत या “स्पिरीट बीअर” चित्रपटा बद्दल. चित्रपट सगळेच चांगले असतात पण बघण्यासारखे आणि वेगळे विषय असलेले चित्रपट फार थोडे असतात. असाच हा चित्रपट जो सगळयांनी बघावा असा. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्टिफन स्कॅयनी यांनी केलय तर निर्माता आहेत चेर्ली-ली फास्ट आणि कथा लिहीली आहे केंट स्टॅनिज यांनी. या सिनेमाचे कलाकार आहेत मार्क रेन्डॉल, ग्राहम ग्रीनी, कॅटी स्टुअर्ट. स्टार एंटरटेंमेंट प्रस्तुत स्पिरीट बीअर हा चित्रपट आहे एका १४ वर्षीय सिमॉन जॅक्सन च्या पर्यावरण आणि पांढर्या अस्वलाच्या बचावा साठी केलेल्या संघर्षाचा ही कथा आहे त्या आंदोलनाची ज्याला सगळी कडून विरोध होउन देखील यश मिळाल ही कथा आहे सिमॉन आणि काही व्यायसायीकां मधील संघर्षाची. सिमॉन जॅक्सन एक १४ वर्षीय मुलगा त्याला फोटोग्राफीची आवड असते शाळेला सुटया असतात म्हणून एकदा तो जंगलात फोटोग्राफी करायला जातो तिथे त्याचा सामना एका काळया अस्वलाशी होतो ते अस्वल त्याला खाणारच असत तेवढयात तीथे एक पांढर अस्वल येत आणि त्याला वाचवत. सिमॉन कसाबसा वाचतो आणि तीथले फोटोज घेउ लागतो तेवढयात त्याची भेट लॉयल ब्लॅकबक यांच्याशी होते दोघ एकमेकांशी चालता चालता बोलतात आणि एका ठीकाणी थांबतात त्यांना दीसत काही लोकांनी बरीचशी झाडे कापली आहेत लॉयल ब्लॅकबक त्याला सांगतात काही लोक आपल्या स्वार्थासाठी झाडे कापत आहेत हे ऐकुन सिमॉन अस्वस्थ होतो आणि मग सुरू होतो १४ वर्षीय सिमॉन आणि व्यायसायीकां मधील संघर्ष. हया संघर्षाला सिमॉन कसा तोंड देतो कस त्या संघर्षाला यश मिळत याची उत्तर चित्रपट बघीतल्या वरच मिळू शकेल घरातील लहान मोठे सर्वजण एकत्र बसुन बघण्यासारखा हा चित्रपट आहे. आणि विषेश म्हणजे आपण आपल्या पर्यावरणाची काळजी घेतली पाहीजे असा सुंदर संदेश देखील या चित्रपटातुन मिळतो जो आज आपल्यासाठी खुप महत्वाचा आहे.



Wednesday, April 15, 2020

श्री सिध्दिविनायक...




नवसाला पावणा-या गणेश मंदीरा पैकी एक मंदीर म्हणजे मुंबईतील प्रभादेवी रोडवरील श्री सिध्दिविनायक मंदीर होय. या गणपतीला “नवसाचा गणपती” किंवा “नवसाला पावणारा गणपती” अस देखील म्हणल जात. हे मंदीर मुंबईतील सर्वात श्रीमंत मंदीरांपैकी एक आहे. अस म्हणल जात सिध्दिविनायक मंदीराच्या बांधकामासाठी देउबाई नावाच्या एका महिलेने अर्थसहाय केले होते त्या निपुत्रिक होत्या. सिध्दिविनायकाच्या दर्शना साठी आलेल्या कोणत्याही महिलांना पुत्रप्राप्तीचा आशिर्वाद मिळावा अशी तीची ईच्छा होती. या मंदीराचे बांधकाम १८०१ साली झाले आहे. या मंदीरास एक छोटासा मंडप आहे. मंदीराच्या लाकडी दारांवर अष्टविनायकांच्या प्रतीमा कोरलेल्या आहेत. तसेच मंदीराचा गाभारा सोन्याने मढलेला आहे. सिध्दिविनायक मंदीराला सिध्दपीठ या नावाने देखील संभोधले जाते. सिध्दिविनायकाची मूर्ती ही पाषाणाची असुन याची सोंड उजव्या बाजुला आहे. या मंदीरात सिध्दिविनायकां बरोबर त्यांच्या पत्नी रिध्दी सिध्दी देखील विराजमान आहेत. सिध्दिविनायकांचे हे रुप अत्यंत मनमोहक आहे.  

थोडस माझ्या छंदांबद्दल...



प्रत्येक व्यक्ती आपल्या छंदांनेच ओळखला जातो. आपण म्हणतो ना “तुझ्या हॉबीज काय आहेत” तेच ते. मी तशी चार चौघां सारखीच आहे. पण थोडी शांत स्वभाव असलेली स्वत:त रमणारी अशी आहे. आपले छंद आपली प्रतीमा असतात अस मला वाटत. मला संगीताची आवड आहे, लेखनाची आवड आहे, मी सोशल ऍक्टीव्हीटीज देखील करते, नवीन मित्र-मैत्रीणी बनवणे, तसेच वेगवेगळी पुस्तक वाचणे, आणि फिरायला जाणे देखील आवडत. खर तर माणसांना समजुन घ्यायच असेल तर जरुर फिरायला जाव. एखादी तरी ट्रीप एकटयाने करावीच अस माझ मत आहे. फिरायला गेल्याने माणस समजतात, समाज समजतो, संस्कृति समजते, तसेच आपल्यात नवीन काही तरी वेगळ करण्याची उर्मी देखील येते. आपले छंद आल्याला घडवतात. तुमचे आहेत असेच काही छंद मला जरुर कळवा कमेंटसची अपेक्षा आहेच.