Wednesday, April 15, 2020

श्री सिध्दिविनायक...




नवसाला पावणा-या गणेश मंदीरा पैकी एक मंदीर म्हणजे मुंबईतील प्रभादेवी रोडवरील श्री सिध्दिविनायक मंदीर होय. या गणपतीला “नवसाचा गणपती” किंवा “नवसाला पावणारा गणपती” अस देखील म्हणल जात. हे मंदीर मुंबईतील सर्वात श्रीमंत मंदीरांपैकी एक आहे. अस म्हणल जात सिध्दिविनायक मंदीराच्या बांधकामासाठी देउबाई नावाच्या एका महिलेने अर्थसहाय केले होते त्या निपुत्रिक होत्या. सिध्दिविनायकाच्या दर्शना साठी आलेल्या कोणत्याही महिलांना पुत्रप्राप्तीचा आशिर्वाद मिळावा अशी तीची ईच्छा होती. या मंदीराचे बांधकाम १८०१ साली झाले आहे. या मंदीरास एक छोटासा मंडप आहे. मंदीराच्या लाकडी दारांवर अष्टविनायकांच्या प्रतीमा कोरलेल्या आहेत. तसेच मंदीराचा गाभारा सोन्याने मढलेला आहे. सिध्दिविनायक मंदीराला सिध्दपीठ या नावाने देखील संभोधले जाते. सिध्दिविनायकाची मूर्ती ही पाषाणाची असुन याची सोंड उजव्या बाजुला आहे. या मंदीरात सिध्दिविनायकां बरोबर त्यांच्या पत्नी रिध्दी सिध्दी देखील विराजमान आहेत. सिध्दिविनायकांचे हे रुप अत्यंत मनमोहक आहे.  

No comments:

Post a Comment