Tuesday, May 12, 2020

शोध - एक रहस्य(भाग- २)


डॉ. रुद्राच घर...
रात्रीची वेळ आहे...
रुद्रा आपल्याच खोलीत विचारमग्न अवस्थेत फे-या मारत असतो तेवढयात त्याला वशिष्ठ लॅबमध्ये कसा आला ते आठउ लागत. आणि तो त्या कडया एकमेकांना जोडुन बघण्याचा प्रयत्न करु लागतो.
भूतकाळात...
रात्रीची वेळ...
डॉ. रुद्रा.(आपल्या केबीनमधून) “कोण आहे रे तिकडे?(मनाशीच) हया लाईटला ही आत्ताच जायच होत. माझी टॉर्च पण दिसत नाहीये. शे.. नेमक आज मोबाईल ही घरीच विसरलोय. आजचा दिवसच खराब आहे. काय होतय काहीच कळत नाहीये.(ओरडुन) अरे मेले का सगळे? किती वेळचा आवाज देतोय कुठे गेले सगळे. रामुSSS. रामु(केबीनमध्ये प्रवेश करत). “माफ करा साहेब मी दुसरी कडे होतो काय झाल.” रुद्रा(थोड शांत होत.) “जा त्या दारे खीडक्या बंद करुन घ्या सगळयांना सांग आणि आज आदर्श आणि गण्या त्या मुलाला घेउन येणार होते न त्याच काय झाल? तुम्हाला एक काम दिल तेही तुमच्या कडून होत नाही हो न. तुमच्यावर विश्वास ठेवतो तेच चुकत माझ आज तो मुलगा हॉस्पिटल ला येणार होता आता कधी येणार आणि कधी पुढची काम होणार देवच जाणे.(तेवढयात सिस्टर मारीया केबीन मध्ये येतात.) “डॉ. आज जो पेशंट येणार होता तो आलाय.” रुद्रा(आश्चर्याने) “काय? एवढया रात्री? ठीक आहे घेउन ये त्यांना आत आणि डॉ. रामनना ही कळव.” मारीया. “ठीक आहे सर.” मारीया निघून जाते.
काही वेळानंतर...
आदर्श(केबीनमध्ये प्रवेश करत) “मी आत येउ का सर?” रुद्रा. “तुला वेगळ निमंत्रण हवय का. ये आता. आदर्श तुला त्याला कधी आणायला सांगितल होत मी आणि तु कधी आला आहेस. हया पावसाला पण आजच यायच होत.(थोड शांत होत.) बर कुठे आहे तो? घेउन ये त्याला.(आदर्श वशिष्ठला घ्यायला बाहेर जातो.)
काही वेळाने..
आदर्श आणि गण्या वशिष्ठला रुद्राच्या केबीन मध्ये घेउन येतात.
रुद्राच केबीन..
रुद्रा विचरमग्न होउन आदर्शची वाट पाहातोय..
तेवढयात आदर्शचा प्रवेश होतो. “डॉ. आम्ही त्याला घेउन आलोय.”
(भानावर येत.) “हं, या बसा. (आपला पेन आणि पॅड काढत रुद्रा वशिष्ठशी बोलु लागतो.) हं. बरं.. काय नाव आहे तुझ?  तुला माहीती आहे तुला इथे का आणलय ते? (वशिष्ठ शांतच राहातो). माझ नाव रुद्रा तुझ काय आहे? (वशिष्ठ एकच करडी नजर टाकतो. त्याच क्षणी थोडया वेळ सगळे शांत होतात. त्याची ती नजर बघून एक क्षण सगळे स्तब्ध होतात.) रुद्रा(विषय बदलत) “हं.. ठीक आहे ये इथे बस.”” (वशिष्ठ स्टुलवर येउन बसतो आणि रुद्रा त्याला तपासतो). डॉ. रुद्रा. “कोण आहे रे तीकडे. मारीया” मारीया पळत येते. “डॉ. बोलवलत?” रुद्रा. “तुला रामन सराना बोलवायला सांगितल होत न काय झाल.” मारीया. “सॉरी सर. डॉ. नुकतेच घरी गेले आहेत मी सांगायच विसरले.” (रुद्रा मारीया वर चिडत) “आज तुम्हा लोकांना झालय काय चुकांवर चुका करत आहेत. जाउ दे हा नवीन मुलगा आपल्या कडे आलाय त्याला वॉर्ड मध्ये शिफ्ट कर उदया सर येउन बघतील.” मारीया ठीक आहे म्हणत वशिष्ठला घेउन जाते. (रुद्रा आपल पॅड आणि पेन सरकवत) “हं. आणि तुम्ही सकाळी त्याच्या आई वडीलांना घेउन या. मला त्याची एकुण एक माहीती हवी आहे. या आता” दोघ निघून जातात.
क्रमश:

No comments:

Post a Comment