Sunday, May 10, 2020

डायरीच कोर पान


 नव्या को-या डायरीच जस प्रत्येक पान हे आधी कोर असत मग आपण त्याला आपल्या विचांरांनी सजवतो. आपली नवी कोरी डायरी ही नंतर जणू आपल्या आयुष्याचा आरसा बनुन जाते. हयाच डायरीने आपल्या आयुष्यातील अनेक चांगले वाईट क्षण बघीतलेले असतात जस काही आपली डायरी ही आपली सख्खी मैत्रीणच आहे. ज्या गोष्टी आपण इतरांना सांगु शकत नाही त्या प्रत्येक गोष्टी आपण आपल्या डायरीला सांगतो. “माझी डायरी” कीती छान वाटत न वाचायला ऐकायला. “माझी डायरी” म्हणजे माझ आयुष्य. मी माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी माझ्या मैत्रीणीला सांगते माझी मैत्रीण माझ सगळ काही ऐकते माझ्याशी बोलते सुध्दा म्हणूनच तर माझी डायरी माझी सगळयात जवळची मैत्रीण आहे. रोजच जगण, दैनंदिन जीवनातील घडामोडी, माझे विचार, माझ्या कल्पना, मी डायरीत लीहुन ठेवते. डायरी म्हणजे आपल्या मनाचा आरसा आपल्या मनाचच प्रतिरुप. डायरी म्हणजेच आपली ओळख.

No comments:

Post a Comment