Wednesday, May 13, 2020

शोध - एक रहस्य (भाग-३)


सकाळची वेळ...
सी. रामन यांच केबीन..
डॉ. रामन आणि त्यांचा असिस्टंट डॉ. रुद्रा चर्चा करत बसले आहेत. तेवढयात आदर्श आणि गण्या वशिष्ठच्या आई वडिलांना घेउन येतात.
आदर्श(केबीनमध्ये येत) “आम्ही आत येउ सर?
सी. रामन(चश्मा घालत) “अं, हं या बसा” सगळे केबीनमध्ये येतात.
डॉ. रुद्रा. “मी तुम्हाला वशिष्ठ बद्दल सांगितल होत न हे त्याचे आई वडील आहेत. मी आदर्शला आज त्यांना घेउन यायला सांगितल होत.”
सी. रामन “बरं.. बरं.. या बसा तुम्हाला येताना काही त्रास झाला नाही न? तुम्हाला माहीत आहे आम्ही तुम्हाला इथे का बोलावल आहे ते?
राजाराम(वशिष्ठचे वडील) “थोड थोड माहीत आहे साहेब. पण नीटस अजुनही कळाल नाहीये आमचा मुलगा तुम्हाला कशाला हवाय. आम्ही गरीब माणस आहोत साहेब दोन वेळच अन्नसुध्दा मोठया मुश्किलीनी जेवतो. त्यातुन आमचा मुलगा हा असा. त्याचा तुम्हाला काय उपयोग होणार?
सी. रामन. “तुझा मुलगा असा आहे म्हणूनच तर आम्हाला त्याची गरज आहे. हे बघ राजाराम तुझ्या मुलाला कुठलाही त्रास होणार नाही याची हमी मी देतो झालाच तर फायदाच होईल. खर तर मी जे काम हाती घेतलय त्यात तुझ्या मुलाची आम्हाला गरज आहे पण ते काम गुप्तपणे करायच असल्याने आम्ही त्याची वाच्यता करु शकत नाही एवढच. पण एक सांगू शकतो हे काम पुर्ण झाल तर तुझा मुलगा पुर्ण पणे बरा होउ शकतो. आणि त्यातुन आम्ही तुम्हाला चांगला मोबदला ही देउ. तुम्ही फक्त इतकच करायच की, वशिष्ठला इथेच ठेवायच. तसेच जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत त्याला भेटायच ही नाही. जोपर्यंत आमच काम होत नाही तो फक्त आमचाच बनुन राहील घाबरु नका त्याला काही होणार नाही.”
सवीता(वशिष्ठची आई) “कस घाबरणार नाही आम्ही, तुम्ही आम्हाला आमचा पोटचा पोरगा मागताय. एकुलता एक मुलगा आमचा त्यातुन त्याचा स्वभाव हा असा काळजी वाटण साहजीक आहे न.”
डॉ. सी. रामन. “अहो म्हणूनच तर आम्ही त्याची निवड केली आहे. मला सांगा उदया जर तो पुर्ण पणे बरा झाला तर तुम्हाला आवडणार नाही?
राजाराम. “कुणाला आवडणार नाही साहेब. एकुलता एक मुलगा आमचा. पुढे आमची सगळी जबाबदारी त्याच्यावरच तर आहे. आम्ही हे असे अडाणी कमी शिकलेले. पोरगा हाताशी आला तर निदान दोन वेळच अन्न तर नीट खाता येईल. तरी...”
डॉ. रामन. “हे बघा प्रश्न एवढाच आहे न तर तुमची जबाबदारी हॉस्पिटल नी घेतली. मग तर झाल आम्ही तुमची सगळी जबाबदारी घेतो तुम्ही फक्त तुमच्या मुलाला आम्हाला दया. आम्हाला त्याच्यावर प्रयोग करायचे आहेत आणि काय माहीत आमच काम संपता संपता तुमचा मुलगा बरा ही होईल. तुम्ही फक्त एकच करायच त्याला इथेच ठेवायच आणि दुसर म्हणजे आम्ही तुम्हाला इथे बोलावल होत हे कुणाला ही सांगु नका. बाकी आमच्यावर सोपवा हं.”
(वशिष्ठचे आई वडील) “ठीक आहे डॉ. जस तुम्ही सांगाल आमच्या मुलाची काळजी घ्या.”
डॉ. रामन. “काळजी करु नका त्याला इथे कुठला ही त्रास होणार नाही.(रुद्राकडे बघत) बरं... रुद्रा त्या दुसर्या मुलाच काय झाल आला का तो.”
डॉ. रुद्रा. “अजुन नाही डॉक्टर. मी बोलावल आहे त्याला पण त्याच्या कडुन अजुन काही उत्तर आलेल नाही.”
डॉ. रामन. “ठीक आहे. बर आता वशिष्ठची सगळी जबाबदारी तुझी आणि मारीयाची आहे. मला त्याचे प्रत्येक लहान मोठे अपडेट्स हवे आहेत हं. (मारीयाला) आणि मारीया वशिष्ठच्या प्रत्येक मुव्हमेंटची एंट्री घे आणि एक फाईल तयार कर. या दोघं.”
डॉ. रुद्रा. आणि मारीया केबीन बाहेर जातात.
डॉ. रामन. (आदर्श आणि गण्या कडे बघत) “तुम्ही ही थोडया वेळ बाहेर थांबा आमच काम झाल की मी बोलवतो.”
दोघ केबीनच्या बाहेर जातात. त्यांच्या बरोबर राजाराम आणि सवीता ही निघु लागतात.
डॉ. रामन. “राजाराम तुम्ही दोघ इथेच थांबा मला जरा तुमच्याशी बोलायच आहे. थोड वशिष्ठ बद्दल जाणून घ्यायच आहे. बसा न.”
दोघ बसतात.
राजाराम. “काय जाणून घ्यायच आहे डॉक्टर?
डॉ. रामन. “मला सांग, तुम्ही वशिष्ठला साधना सेवाभावी संस्थेत का ठेवलत?
राजाराम. “डॉक्टर, वशिष्ठ आमचा सख्खा मुलगा नाहीये. आम्ही त्याला आधार अनाथाश्रमातुन दत्तक घेतल होत. आम्हाला कुणी मुल नव्हत खुप डॉक्टर वैदय झाले पण काहीच उपयोग झाला नाही. म्हणून शेवटी आम्ही आधार आश्रमाच्या सरला ताइंना भेटलो. त्यांनी आम्हाला हे सुचवल. आम्हाला मुल ही दाखवली आमच अस काहीच न्हवत की मोठ मुल हव लहान मुल हव किंवा मुलगाच हवा मुलगीच हवी आम्हाला फक्त एक मुल हव होत. आणि जेव्हा सरला ताईंनी आम्हाला वशिष्ठ ची ओळख करुन दिली तेव्हा तो आम्हाला लगेच आवडला. आणि आम्ही त्याला घरी घेउन आलो. त्याच नाव पण आम्ही ठेवलेल नाहीये ज्या नावाची तीथे नोंद होती तेच नाव आम्ही त्याच ठेवल.”
डॉ. रामन. “काय? वशिष्ठ तुमचा मुलगा नाही. हं, ठीक आहे तो तुमच्या कडे आला तेव्हा किती वर्षाचा होता.?
राजाराम. “साधारण १० वर्षाचा. पण आम्ही जेव्हा त्याला घरी आणल तेव्हा पासुनच आम्हाला त्याच्यात काही तरी वेगळे पण जाणवायच. म्हणजे तो इतरां सारखा नाहीच आहे. कुणी तरी वेगळाच आहे.”
डॉ. रामन. “अस वाण्याच काही कारण?  तुम्हाला अस का वाटलं”
सवीता. “कारण तो नेहमी शांत शात रहायचा जस काही त्याच्या मनात काही तरी चालु आहे. बाहेर जायचा नाही, कुणाशी बोलायचा नाही आपल्यातच रहायचा हं आणि सारख एकटयात कुणाशी तरी बोलायचा. पण समोर बघीतल तर कुणीच नसायच. आम्ही बरेच डॉक्टर केले दान धर्म केला पण सगळ व्यर्थ ज्या ज्या डॉक्टरानां दाखवल सगळयानी एकच सांगितल नवीन घर आहे आणि माणसही तुमच्या कडे रूळायला त्याला थोडा वेळ लागेल तो पर्यंत काही गोळया औषध देतोय त्या देत रहा. पण आम्हाला माहीत आहे तो साधारण मुलगा नव्हता.”
डॉ. रामन. “तुम्ही त्याची चौकशी नाही केलीत म्हणजे त्याला अनाथ आश्रमात कुणी सोडल त्याचे पहिले आई वडील कोण होते. आणि तो असा का झाला.”
सवीता. “कधी गरजच पडली नाही. आपल्या आयुष्यात एक सुंदर फुल उमललय त्याच्या समोर आम्ही सगळच विसरलो. जस जसा वशिष्ठ मोठा होत गेला तस तस मात्र त्याच हे वेगळे पण वाढतच गेल मग मात्र आम्ही त्याला साधना सेवाभावी संस्थेत ठेवायचा निर्णय घेतला. तीथे अष्या लोकांवर उपचार केले जातात. ते एक वेडयांचे हॉस्पिटल आहे. आणि वशिष्ठ तीथे बराही झाला होता घरी पण येणार होता तेव्हाच त्याला तुम्ही इथे आणलत.”
डॉ. रामन. “काळजी करु नका इथे तुमचा मुलगा अगदी ठणठणीत होईल. बर वशिष्ठवर उपचार करण्या साठी मला इतकी माहीती पुरेशी आहे. आता तुम्ही या. हं.(डॉ. रुद्राला आवाज देतात) रुद्राSSS.”
डॉ. रुद्रा. “डॉक्टर बोलवलत.?
डॉ. रामन. “हो, हे बघ वशिष्ठ ची एक खुप मोठी लीड मीळाली आहे. आता त्यावर अजुन व्यवस्थीत नजर ठेवावी लागेल. मला त्याचे एकुण एक अपडेट हवे आहेत. राजाराम सांगत होता तो आपल्याच मनाशी काही तरी बोलायचा जर आपल्याला ते समजल तर पहिल्याच टप्यात मोठा पलडा आपण गाठु तेव्हा त्याच्यावर बारकाइने लक्ष ठेव आणि त्याचा एक रिपोर्ट बनउन मला दे.”
रुद्रा. “ठीक आहे. डॉक्टर.” अस म्हणून रुद्रा निघून जातो..
क्रमश:

No comments:

Post a Comment